सभासदत्वाची नोंदणी

Please select swimming pool.

Membership for this pool is not available.

Please select membership type.

प्रतीक्षा यादीत नाव नोंदविण्याच्यावेळी असलेले आपले वय .

Your age is years.

This field is required.

कृपया आपले वैद्यकीय प्रमाणपत्र जोडा.

Preview

अपलोड केलेली फाईल 5 mb पेक्षा मोठी नसावी.

कृपया आपला छायाचित्राचा दाखला, जन्म दिनांकाचा दाखला, आणि पत्त्याचा दाखला जोडा

Preview

अपलोड केलेली फाईल 5 mb पेक्षा मोठी नसावी.

कृपया आपले 40% दिव्यांगता असलेले दिव्यांग प्रमाणपत्र जोडा.

Preview

अपलोड केलेली फाईल 5 mb पेक्षा मोठी नसावी.

कृपया बृहन्मुंबई महानगर पालिकेचे माननीय नगरसेवक असल्याचे ओळखपत्र जोडा.

Preview

अपलोड केलेली फाईल 5 mb पेक्षा मोठी नसावी.

कृपया बृहन्मुंबई महानगर कार्यरत कर्मचारी असल्याचे ओळखपत्र जोडा.

Preview

अपलोड केलेली फाईल 5 mb पेक्षा मोठी नसावी.

कृपया बृहन्मुंबई महानगर निवृत्त कर्मचारी असल्याचे ओळखपत्र जोडा

Preview

अपलोड केलेली फाईल 5 mb पेक्षा मोठी नसावी.

कृपया आपले छायचित्र जोडा.

Preview

-किंवा-

Captured Image

Preview

अपलोड केलेली फाईल 200 kb पेक्षा मोठी नसावी.

साठी, सभासदत्व शुल्क रु. आहे.

Please select swimming pool.

Swimming Pool

नियमावली

जलतरण तलाव सभासदांसाठी नियम

तरण तलावाचे सभासदत्व घेताना पारदर्शकता असावी, म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने ऑनलाईन सभासद नोंदणी सेवा सुरू केली असून तरण तलावाचे सभासदत्व घेऊ इच्छिणा-या नविन सभासदांना फक्त ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेता येणार आहे. ऑफलाईन प्रवेशाची प्रक्रीया संपूर्णपणे बंद केली असून सभासदत्वाचे नुतनीकरण देखील ऑनलाईन पध्दतीनेच करणे क्रमप्राप्त आहे.

अ) ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया (वार्षिक सभासदत्व घेणा-या सभासदांसाठी) :

  1. नवीन सभासदत्व तरण तलावाच्या क्षमतेनुसार/उपलब्धतेनुसार देण्यात येईल. सभासदत्व तरण तलावाच्या नियमांच्या अधीन राहून देण्यात येईल. सभासदत्वासाठी इच्छुक उमेद्वारांनी, बृहन्मुंबई महानगरपालिका जेव्हा जाहीर करेल तेव्हा संगणक प्रणालीत ऑनलाईन पध्दतीने सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे. सभासदत्व नोंदणी मोबाईलव्दारे, संगणकाव्दारे करता येणे शक्य आहे.
  2. सभासदत्व नोंदणी झाल्यावर सभासदाने संबंधित तरण तलाव कार्यालयात सभासदत्व सक्रीय करण्यासाठी खालील नमूद कागदपत्रे घेऊन सभासदत्व घेतलेल्या दिवसापासून तीस दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रे सादर करावीत व संगणक प्रणालीत समाविष्ट करण्यासाठी छायाचित्र जे की, प्रशासनातल्या कर्मचा-यांमार्फत प्रत्यक्षात काढण्यात येईल व त्याचा उपयोग सभासदाला तरण तलावाची सुविधा उपभोगण्यासाठी फेस रेकग्नाईस मशीनच्या माध्यमातून प्रवेश/निर्गमन करण्यासाठी होईल. कागदपत्रे सादर केल्याशिवाय सभासदत्व सक्रीय होणार नाही. तीस दिवसांच्या कालावधीत कागदपत्रे सादर करणा-या सभासदाचे सभासदत्व, कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकापासून सक्रीय/वैध धरण्यात येईल. तीस दिवसांच्या कालावधीनंतर कागदपत्रे सादर करणा-या सभासदांचे सभासदत्व, नोंदणीकरणाच्या दिनांकापासून सक्रीय/वैध धरण्यात येईल.

    a) सभासदास महानगरपालिकेच्या एका जलतरण तलावाचे फक्त एकच सभासदत्व घेता येईल. एका जलतरण तलावासाठी एका पेक्षा अधिक वेळा सभासदत्व घेता येणार नाही, तथापि दुस-या जलतरण तलावाचे सभासदत्व नियमित शुल्क भरून घेता येऊ शकेल. सभासदाला त्याने सभासदत्व घेतलेल्या जलतरण तलावाव्यतिरिक्त दुस-या जलतरण तलावावर पोहण्यासाठी परवानगी नसेल.

  3. ऑनलाईन पध्दतीने सभासद नोंदणी करताना ज्या नावाने ऑनलाईन प्रणालीत सभासद नोंदणी करण्यात आली आहे. त्याच सभासदाला जलतरण तलावाचे सभासदत्व देण्यात येईल. सदर सभासदत्व अहस्तांतरणीय आहे ह्याची, नोंद घ्यावी.
  4. अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरावा. आपण नोंदणी करत असलेल्या जलतरण तलावाचे नाव, सभासदाचे नाव, आपला मोबाईल क्रमांक/ईमेल, आपण निवडलेली सभासदत्वाची श्रेणी व सभासदाने अर्जात भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खातरजमा करावी.

    a) सभासदाने सभासदत्वाचा ऑनलाईन अर्ज करताना केलेल्या चुकीमुळे किंवा सभासदत्वाची श्रेणी बदलावी लागल्यास वरच्या श्रेणीतील देय शुल्काच्या फरकाची रक्कम भरून सभासदत्व लागू असलेल्या श्रेणीच्या नियमांची पूर्तता करून सभासदत्व सक्रीय करता येईल.

    b) ऑनलाईन नोंदणी केल्यापासून तीस दिवसांच्या कालावधीत श्रेणी बदलाविषयी कागदपत्रे करून तसेच आवश्यकतेनुसार सभासदत्व शुल्काची तफावत भरल्यास त्या दिवसापासून सभासदाचे सभासदत्व सक्रीय/वैध धरण्यात येईल. तथापि श्रेणी बदलाविषयी कागदपत्रे सादर करून तसेच आवश्यकतेनुसार सभासदत्व शुल्काची तफावत तीस दिवसांच्या कालावधीनंतर भरल्यास सभासदांचे सभासदत्व, नोंदणीकरणाच्या मूळ दिनांकापासून सक्रीय/वैध धरण्यात येईल.

    c) चुकीचा तरण तलाव निवडणा-या सभासदास दुस-या तरण तलावाचे सभासदत्व बदलून दिले जाणार नाही, अशा सभासदास नियम क्र.3. नुसार सभासदत्व शूल्काचा परतावा मिळू शकेल.

    d) ऑनलाईन सभासदत्व नोंदणी प्रक्रीयेव्दारे प्रवेश घेताना काही मानवी/संगणकीय चुका घडल्यास त्या दुरूस्त करण्याबाबतचे सर्व अधिकार प्रशासन आपल्याकडे राखून ठेवत आहे. अशा बाबतीत प्रशासनाने घेतलेला निर्णय सभासदांना बंधनकारक असेल.

  5. सभासदत्वाच्या श्रेणी व श्रेणीनुसार सादर करावयाची मूळ (Original) कागदपत्रे :-

    5.1. सर्वसाधारण सभासद

    • (1) छायाचित्र असलेले कोणतेही शासनमान्य ओळखपत्र
    • (2) निवासाचा पत्ता असलेले कोणतेही शासनमान्य ओळखपत्र. (उपरोक्त दोन्ही एकाच ओळखपत्रावर असले तरिही चालेल)
    • (3) वैद्यकिय प्रमाणपत्र (परिशिष्ट क्र.एक नुसार)
    5.2. शालेय विद्यार्थी
    • (1) छायाचित्र असलेले कोणतेही शासनमान्य ओळखपत्र
    • (2) निवासाचा पत्ता असलेले कोणतेही शासनमान्य ओळखपत्र.
    • (उपरोक्त दोन्ही एकाच ओळखपत्रावर असले तरिही चालेल)
    • (3) वैद्यकिय प्रमाणपत्र (परिशिष्ट क्र.एक नुसार)
    • (4) शालेय विद्यार्थी असल्याचा दाखला (Bona-Fide Certificate) सवलतीच्या दरात सभासदत्व हवे असल्यास [तथापि ही सुविधा वय वर्षे पंधरा पूर्ण होईपर्यंत अथवा दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच (जे कमी असेल त्याप्रमाणे) उपलब्ध असेल.]
    • (5) सभासदाचे वय वर्षे तीन (दोन वर्षे पूर्ण) ते सहा वर्षे दरम्यान असणा-या सभासदांसमवेत त्या सभासदाची जबाबदारी घेणारे पालक किंवा पालकांनी नियुक्त केलेली जिचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी नाही अशी व्यक्ती, तरण तलावाची सभासद असणे आवश्यक असून वय वर्षे तीन ते सहा दरम्यानच्या सभासदाने सभासद पोहण्याची सुविधा उपभोगताना जबाबदारी घेतलेल्या सभासदाने त्याच्या समवेत जलतरण तलावात उपस्थित राहणे (पाण्यात उतरणे) बंधनकारक आहे. जबाबदारी घेणा-या सभासदाव्यतिरिक्त तरण तलावाची सुविधा उपभोगणारा सभासद आढळल्यास त्याचे सभासदत्व रद्द करण्याचे अधिकार प्रशासन राखून ठेवत आहे. जबाबदारी घेणा-या व्यक्तीने परिशिष्ट क्र.दोन नुसार सभासद असलेल्या पालकाने अथवा सदर सभासदाची जबाबदारी घेणा-या सभासदाने (अठरा वर्षे पूर्ण) प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
    • (6) वय वर्षे सात (सहा वर्षे पूर्ण) ते अठरा दरम्यान असणा-या सभासदांसाठी परिशिष्ट क्र.तीन नुसार पालकाने प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
    5.3.जेष्ठ नागरिक
    • (1) छायाचित्र असलेले कोणतेही शासनमान्य ओळखपत्र
    • (2) निवासाचा पत्ता असलेले कोणतेही शासनमान्य ओळखपत्र.
    • (उपरोक्त दोन्ही एकाच ओळखपत्रावर असले तरिही चालेल)
    • (3) वैद्यकिय प्रमाणपत्र (परिशिष्ट क्र.एक नुसार)
    • (4) वयाची 60 वर्षे पूर्ण झालेली असणे आवश्यक. (शासनाने दिलेला वरिष्ठ नागरिक असल्याबाबतचा दाखला किंवा जन्मदिनांकाची नोंद असलेला शासनमान्य कोणताही दाखला)
    5.4.दिव्यांग नागरिक
    • (1) छायाचित्र असलेले कोणतेही शासनमान्य ओळखपत्र
    • (2) निवासाचा पत्ता असलेले कोणतेही शासनमान्य ओळखपत्र.
    • (उपरोक्त दोन्ही एकाच ओळखपत्रावर असले तरिही चालेल)
    • (3) वैद्यकिय प्रमाणपत्र (परिशिष्ट क्र.एक नुसार)
    • (4) 40% किंवा त्यावरील दिव्यांगत्वाबाबतचे शासनमान्य प्रमाणपत्र
    5.5.बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी/सेवानिवृत्त बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी/ बृहन्मुंबई महानगरपालिका नगरसेवक
    • (1) छायाचित्र असलेले कोणतेही शासनमान्य ओळखपत्र
    • (2) निवासाचा पत्ता असलेले कोणतेही शासनमान्य ओळखपत्र.
    • (उपरोक्त दोन्ही एकाच ओळखपत्रावर असले तरिही चालेल)
    • (3) वैद्यकिय प्रमाणपत्र (परिशिष्ट क्र.एक नुसार)
    • (4) कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र
    • (5) कर्मचा-याच्या पगाराची चालू महिन्याची पावती
    • (6) सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या बाबतीत निवृत्तीवेतन पुस्तिकेची छायांकित प्रत अथवा सेवानिवृत्त कर्मचा-याचे ओळखपत्र
    • (7) सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या निवृत्तीवेतन बँक खात्याची छायांकित प्रत
    • (8) बृहन्मुंबई महानगरपालिका नगरसेवक असल्याबाबतचे दस्तऐवज/दाखला. पदावर असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका नगरसेवकांना ही सवलत उपलब्ध आहे. (बडतर्फ केलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांना/नगरसेवकांना सवलत दिली जाणार नाही.) (सदर सवलत फक्त महानगरपालिका कर्मचारी व नगरसेवकांसाठी असून त्यांच्या कुटुंबीयांसाठी लागू नाही.)
    5.6.खेळाडू
    • (1) छायाचित्र असलेले कोणतेही शासनमान्य ओळखपत्र
    • (2) निवासाचा पत्ता असलेले कोणतेही शासनमान्य ओळखपत्र.
    • (उपरोक्त दोन्ही एकाच ओळखपत्रावर असले तरिही चालेल)
    • (3) वैद्यकिय प्रमाणपत्र (परिशिष्ट क्र.एक नुसार)
    • (4) प्रशासनाने निर्धारित केलेल्या शुल्कसूचीनुसार लागू असणारी कागदपत्रे.

ब) ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया (मासिक व त्रैमासिक सभासदत्व घेणा-या सभासदांसाठी) :

  • (1) मासिक व त्रैमासिक सभासदत्व सर्वसाधारणत: वर्षातून दोन वेळा उपलब्ध करून दिले जाईल. उपलब्धतेबाबचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रशासनाकडे राहिल.
  • (2) मासिक व त्रैमासिक सभासदत्व प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या कालावधीसाठी मर्यादीत असेल. अशा सभासदाने, सभासदत्व नोंदणी झाल्यावर संबंधित तरण तलाव कार्यालयात सभासदत्व सक्रीय करण्यासाठी अ) 5 मध्ये नमूद केलेल्या व त्याला लागू असलेल्या प्रवर्गानुरूप कागदपत्रांसह सभासदत्व घेतलेल्या दिवसापासून सात दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून संगणक प्रणालीत समाविष्ट करण्यासाठी छायाचित्र काढण्यासाठी उपस्थित व्हावे (जे प्रशासनातल्या कर्मचा-यांमार्फत प्रत्यक्षात काढण्यात येईल) व त्याचवेळी सभासदत्वासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तरण तलाव कार्यालयात सादर करावीत. प्रशासनाने काढलेल्या छायाचित्राचा उपयोग सभासदाला तरण तलावाची सुविधा उपभोगण्यासाठी फेस रेकग्नाईस मशीनच्या माध्यमातून प्रवेश/निर्गमन करण्यासाठी होईल. कागदपत्रे सादर केल्याशिवाय सभासदत्व सक्रीय होणार नाही. सात दिवसांच्या कालावधीत कागदपत्रे सादर करणा-या सभासदाचे सभासदत्व, कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकापासून सक्रीय/वैध धरण्यात येईल. सात दिवसांच्या कालावधीनंतर कागदपत्रे सादर करणा-या सभासदांचे सभासदत्व, नोंदणीकरणाच्या दिनांकापासून सक्रीय/वैध धरण्यात येईल.
  • (3) मासिक व त्रैमासिक सभासदत्व घेतलेल्या सभासदाने कोणत्याही कारणांस्तव सभासदत्व रद्द केल्यास कोणत्याही प्रकारे भरलेल्या शुल्काचा परतावा सभासदाला मिळणार नाही.

परिशिष्ट क्र.एक :- वैद्यकीय प्रमाणपत्र

वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करताना प्रमाणपत्रात, सभासदत्व घेणा-या व्यक्तीस कोणत्याही स्वरूपाचा त्वचारोग/संसर्गजन्य रोग नाही व सभासदत्व घेणारी व्यक्ती पोहण्यासाठी सक्षम आहे, असे स्पष्ट नमूद असणे बंधनकारक आहे.

वैद्यकीय प्रमाणपत्र

परिशिष्ट क्र.दोन :- वय वर्षे तीन (दोन वर्षे पूर्ण) ते सहा वर्षे दरम्यान असणा-या सभासदांसाठी प्रतिज्ञापत्र

वय वर्षे तीन (दोन वर्षे पूर्ण) ते सहा वर्षे दरम्यान असणा-या सभासदांसाठी खालील नमून्यातील प्रतिज्ञापत्र सभासद असलेल्या पालकाने/जबाबदारी घेणा-या सभासदाने सादर करणे आवश्यक आहे.

वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय प्रमाणपत्र

परिशिष्ट क्र.तीन :- वय वर्षे सात (सहा वर्षे पूर्ण) ते अठरा दरम्यान असणा-या सभासदांसाठी प्रतिज्ञापत्र

वय वर्षे सात (सहा वर्षे पूर्ण) ते अठरा दरम्यान असणा-या सभासदांसाठी खालील नमून्यातील प्रतिज्ञापत्र सभासदाच्या पालकाने सादर करणे आवश्यक आहे.

वैद्यकीय प्रमाणपत्र

वार्षिक सभासदत्वासाठी सशुल्क प्रतिक्षा यादी :

  • (1) ज्या सभासदांना नियमित वार्षिक सभासदत्व मिळालेले नाही तथापि वार्षिक सभासदत्व हवे आहे, असे सभासद रू.560/- इतक्या रक्कमेचा ऑनलाईन पध्दतीने भरणा करून प्रतिक्षायादीत नाव नोंदवू शकतात.
  • (2) प्रतिक्षा यादीतील व्यक्तीस सभासदत्व उपलब्ध करुन दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत सभासदत्वाची उर्वरित रक्कम भरणे आवश्यक राहिल. तसे न केल्यास सदर सभासदाचे नाव प्रतिक्षा यादीतून रद्द करण्यात येईल व त्याने भरलेली रक्कम पूर्णपणे महानगरपालिकेच्या महसूलात जमा करण्यात येईल.
  • (3) प्रतिक्षा यादीत नाव नोंदविणारा सभासद, त्याला नियमित वार्षिक सभासदत्वाची उपलब्धता करून देण्यापूर्वीपर्यंत त्याचे नाव प्रतिक्षा यादीतून कमी करण्याबाबत ऑनलाईन विनंती करू शकतो, असे करणा-या सभासदाने भरलेल्या शुल्कातून फक्त 20% इतकी रक्कम प्रशासकीय आकार म्हणून समायोजित करण्यात येईल व उर्वरित रक्कम सभासदाला परत करण्यात येईल.
  • (4) प्रतिक्षा यादीनुसार सभासदत्व उपलब्धतेबाबत कळविण्यात आल्यानंतर सभासदाला त्याचे नांव प्रतिक्षा यादीतून कमी करण्याचा पर्याय उपलब्ध राहणार नाही व कोणत्याही प्रकारे भरलेल्या शूल्काचा परतावा मिळणार नाही.

सभासदत्व शूल्काचा परतावा :

  • (1) फक्त वार्षिक सभासदत्व घेतलेल्या व सभासदत्व परत करू इच्छिणा-या सभासदांना ही सुविधा उपलब्ध आहे.
  • (2) सभासदत्व रद्द करू इच्छिणा-या अशा सभासदाचा सभासदत्व शिल्लक असण्याचा कालावधी 90 दिवसांपेक्षा अधिकचा असणे बंधनकारक आहे.
  • (3) परताव्यासाठीचा अर्ज सभासदाने प्रशासनाने निर्धारित केलेल्या ऑनलाईन पध्दतीने सभासदाला दिलेल्या लॉग-इन मधूनच करणे बंधनकारक आहे.
  • (4) सभासदाने सभासदत्व परत करण्याच्या अर्जाच्या वेळेपासून सभासदाचे सभासदत्व संगणक प्रणालीव्दारे तात्पुरते स्थगित केले जाईल व संबंधित अधिका-याने मंजूरी दिल्यावर परताव्याचा अर्ज लेखा विभागाकडे परताव्याच्या अधिदानासाठी अग्रेषित होईल. तथापि ज्या प्रकरणांत संबंधित अधिका-याने परताव्याचा अर्ज नामंजूर केला तर त्या सभासदाचे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेले सभासदत्व त्याच्या सभासदत्व दिनांकापर्यंत पुनर्स्थापित करून देण्यात येईल. सभासदाने सभासदत्व परत करण्याचा अर्ज सादर केल्यावर कोणत्याही परिस्थितीत अर्ज मागे घेता येणार नाही.
  • (5) सभासद शुल्काचा परतावा देताना प्रवेश शुल्क/नुतनीकरण शुल्क ह्याचा परतावा दिला जाणार नाही.
  • (6) फक्त सभासद शुल्काचा परतावा सभासदाने सभासदत्व परत केलेल्या दिनांकापासून सभासदत्व संपण्याच्या दिनांकाच्या कालावधीपर्यंत देण्यात येईल.
  • (7) असा परतावा देताना उर्वरित कालावधीसाठीच्या देय रक्कमेतून 30% रक्कम प्रशासकीय आकार म्हणून वजा करून उर्वरित 70% रक्कमेचा परतावा करण्यात येईल.
  • (8) प्रशासनाने कारवाई करून रद्द केलेल्या सभासदाला कोणत्याही प्रकारे परतावा दिला जाणार नाही.
  • (9) प्रशासनाने सभासदत्व रद्द केलेल्या सभासदाने जर प्रशासनाच्या लेखी परवानगी शिवाय ऑनलाईन पध्दतीने पुनश्च सभासदत्व घेतले तर अशा सभासदाचे नव्याने घेतलेले सभासदत्व देखील रद्द करण्याचे अधिकार प्रशासनाकडे असतील व अशा प्रकरणात कोणताही परतावा दिला जाणार नाही.
  • (10) मासिक व त्रैमासिक सभासदत्व घेतलेल्या सभासदाला कोणत्याही कारणांस्तव सभासदत्व रद्द केल्यास सभासदत्वाचा कोणत्याही प्रकारे परतावा मिळणार नाही.
  • (11) सभासदत्व शूल्क परतावा प्रशासनाच्या नियम व अटींसापेक्ष दिला जाईल.
सभासदत्वाचे नुतनीकरण
  • (1) सभासदत्वाचे नुतनीकरण फक्त ऑनलाईन पध्दतीने करता येईल.
  • (2) सभासदत्वाचे नुतनीकरण पूर्वीचे सभासदत्व संपण्याच्या दिनांकापर्यंत करणे आवश्यक असून नुतनीकरणासाठी कोणत्याही प्रकारे वाढीव मुदत देण्यात येणार नाही.
  • (3) नुतनीकरण न केल्यामुळे रद्द झालेले सभासदत्व पुनर्जिवीत करता येणार नाही.
  • (4) नुतनीकरणानंतर पोहण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी सभासदाने परिशिष्ट क्र.एक नुसार वैद्यकिय प्रमाणपत्र कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करेपर्यंत सभासदाला तरण तलावात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येईल.
  • (5) सवलतीच्या दरांत नुतनीकरण करणा-या सभासदांनी आवश्यक ती कागदपत्रे कार्यालयास सादर करणे बंधनकारक असून कागदपत्रे सादर करेपर्यंत सभासदाला तरण तलावात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येईल.
महिलांसाठीच्या विशेष सत्राकरिता सवलतीबाबतच्या अटी व शर्ती
  1. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि.08.03.2023 पासून, महिलांसाठी राखीव असलेल्या सत्रांत महिला सभासदांना विशेष सवलतीच्या दरांत प्रवेश देण्यात येईल व त्यांचा सभासद कालावधी दि.01.04.2023 पासून सुरू होईल.
  2. दि.08.03.2023 पासून, महिलांसाठी राखीव असलेल्या सत्रांसाठी प्रवेश घेणा-या महिलांना सभासद शूल्कात 25% सवलत देण्यात येईल.
  3. ज्या महिला सभासदांनी दि.08.03.2023 पूर्वी वार्षिक सत्रासाठी प्रवेश घेतला असेल किंवा वार्षिक सभासदत्वाचे नुतनीकरण केलेले असेल,अशा फक्त महिला सभासद जर तरण तलावाच्या सर्वसाधारण वेळांऐवजी फक्त महिला सभासदांसाठीच्या राखीव वेळेची सुविधा घेऊ इच्छित असतील तर अशा महिला सभासदांना त्यांनी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सभासदत्वाच्या अंतिम दिनांकापर्यंतचा कालावधी जर 90 दिवसांपेक्षा अधिक असेल तर अशा महिला सभासदांना त्यांनी भरलेल्या एकूण उर्वरित कालावधीच्या अतिरिक्त सभासदत्व शुल्काचे परिगणन करून अशा सभासदांना सभासदत्व मान्यता कालावधी वाढवून देण्यात येईल. तथापि सत्र बदल करू इच्छिणा-या महिला सभासदांच्या सभासदत्वाचा अंतिम सभासद दिनांक 90 दिवसांपेक्षा कमी असेल तर अशा महिला सभासदांना सत्र बदलामुळे मिळणारी सवलत लागू होणार नाही. नुतनीकरण करताना सत्र बदलाची विनंती केल्यास सवलत शुल्क भरून नुतनीकरण करून देण्यात येईल.
  4. उपरोक्त नमूद सवलती घेऊन प्रवेश घेणा-या/नुतनीकरण करणा-या महिला सभासदांना महिलांसाठी राखीव सत्रांव्यतिरिक्त इतर सत्रांत पोहण्यास बंदी असेल.
  5. उपरोक्त नमूद सवलती न घेता प्रवेश घेणा-या/नुतनीकरण करणा-या महिला सभासदांना महिलांसाठी राखीव सत्रांसह इतरही सर्व सत्रांत पोहण्यास अनुमती असेल.
  6. सवलत प्रवर्गांत म्हणजेच शालेय विद्यार्थी,बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी/नगरसेवक, वरिष्ठ नागरिक तसेच दिव्यांग नागरिक ह्या विशेष प्रवर्गांत प्रवेश घेणा-या महिला सभासदांना उपरोक्त नमूद सवलती देण्यात येणार नाहीत.
  7. सदर सवलत मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक महिला सभासदांकरिता देखिल असेल. महिलांसाठी राखीव सत्रांव्यतिरिक्त इतर सत्रांत पोहायला येणा-या महिलांना कोणतीही सूट देण्यात येणार नाही.
  8. सदर सवलतीच्या सत्रात प्रवेश घेणा-या सभासदांना जलतरण तलाव सभासदांसाठीचे सर्वसाधारण नियम लागू असतील.
  9. सदर सवलतीचे दर रद्द करण्याचे अधिकार प्रशासनाकडे राहतील.
पाहुणा सभासद

तरण तलावाच्या सभासदाच्या ऑनलाईन शिफारशीनुसार ज्या अभ्यागताला पोहता येत आहे, अशा अभ्यागतास तरण तलावाचे दैनंदिन तिकिट मिळू शकेल. पोहता न येणारा अभ्यागत आढळल्यास त्याला तरण तलावाबाहेर काढण्यात येईल व भरलेल्या शूल्काचा कोणताही परतावा दिला जाणार नाही. असे तिकिट काढताना मूळ सभासदाच्या लॉग-इन मधून तो सभासद ज्या तरण तलावाचा आहे त्याच तरण तलावाचे तिकिट अभ्यागतासाठी आगाऊ शूल्क भरून उपलब्ध होऊ शकेल. पाहूणा सभासदाला परिशिष्ट क्र.एक नुसार वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून वैद्यकिय प्रमाणपत्राची वैधता एक वर्षाची असेल. वैद्यकिय प्रमाणपत्र सादर न करणा-या पाहूणा सभासदास तरण तलावाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही व शूल्काचा परतावा दिला जाणार नाही.

पाहूणा सभासदाला नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ त्याने तरण तलावाची सुविधा उपभोगल्यास नियम क्र.8(8) नुसार मूळ सभासदावर कारवाई केली जाईल. पाहूणा सभासदाने गैरवर्तन केल्यास मूळ सभासदाचे सभासदत्व रद्द करण्याचे अधिकार प्रशासनाकडे राहतील.

खण (Lockers)

पोहण्यासाठी येणा-या प्रत्येक सभासदांनी उपलब्ध लॉकरला स्वत:चे कुलुप लावून लॉकर वापरून जलतरणाची सुविधा घेतल्यावर तरण तलाव सोडण्यापूर्वी लॉकर रिकामा करुन स्वत:चे सामान व कुलुप घेऊन जावे. त्यामुळे पोहण्यासाठी येणा-या प्रत्येक सभासदास खण उपलब्ध होतो. पोहण्याच्या सत्राची वेळ संपल्यावर खण रिकामा करुन न जाणारा सभासद आढळून आला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल किंवा असा सभासद आढळून न आल्यास किंवा त्याची ओळख न पटल्यास खणाचे कुलुप कापून टाकण्यात येईल व आतील सामानाची विल्हेवाट लावण्यात येईल, याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कोणतीही जबाबदारी स्विकारत नाही. अशा प्रकरणांत दंडात्मक कारवाई/ सभासदत्व रद्द करण्याचे अधिकार प्रशासनाच्या अधीन राहतील.

सर्वसाधारण नियम
  • (1) प्रत्येक सभासदाने स्वत:च्या जबाबदारीने पोहावयाचे असून तरण तलाव परिसरातील कोणत्याही अपघातास /दुर्घटनेस बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही.
  • (2) सभासदास संगणकिय प्रणालीव्दारे प्रवेश नोंदविल्याशिवाय जलतरण तलावात प्रवेश दिला जाणार नाही.
  • (3) सद्यस्थितीत वार्षिक सभासदत्व (365 दिवसांपैकी, लागू असलेल्या सार्वजनिक व साप्ताहिक सुट्ट्या आणि प्रशासनाने मंजूर केलेल्या कार्यक्रमांसाठी वर्षभरात बारा दिवस वगळून) देण्यात येईल. प्रशासनाने मासिक/त्रैमासिक सभासदत्वाबाबत नव्याने निश्चित केलेल्या धोरणाला अनुसरून सभादत्व देण्यात येईल.
  • (4) सभासदत्व घेतलेल्या सभासदाला साप्ताहिक व सार्वजनिक सुट्ट्या वगळून तरण तलाव चालू असलेल्या दिवशी खाली नमूद केलेल्या वेळांमध्ये सलगतेने एकंदर 60 मिनिटांच्या कालावधीत जलतरणाची सुविधा वापरण्याची अनुमती आहे, ज्यात पोहण्यापूर्वी आणि पोहण्यानंतरच्या स्नानाचा व कपडे बदलण्याचा वेळ समाविष्ट आहे. (पोहण्यापूर्वी स्नान करणे सक्तीचे असून पोहण्यानंतर अंघोळीची सक्ती नाही.)
  • (5) शिकाऊ सभासदांना उपस्थित जलतरण निर्देशकांव्दारे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. शिकाऊ सभासदाने तरण तलाव परिसरात डोक्यावर लाल रंगाची टोपी घालणे बंधनकारक आहे. अन्यथा त्याचे सभासदत्व रद्द करण्यात येईल.
  • (6) सभासदांना जलतरण तलावात जलतरण तलावाच्या क्षमतेनुसारच प्रवेश देण्यात येईल. सभासदांनी तरण तलावाच्या नियमावलीतील अनुक्रमांक 4 येथे नमूद केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत खालील नमूद वेळांत तरण तलावांची सुविधा सुरू आहे.
    प्रवर्ग जलतरण तलावाच्या वेळा : मंगळवार ते रविवार
    सर्व सभासदांसाठी सकाळी 06.00 ते सकाळी 11.00
    फक्त महिला सभासदांसाठी सकाळी 11.00 ते दुपारी 12.00
    सायं. 05.00 ते सायं. 06.00
    सर्व सभासदांसाठी सायंकाळी 06.00 ते रात्रौ 10.00

    प्रत्येक सोमवारी साप्ताहीक सुट्टी म्हणून तरण तलावाची सुविधा सभासदांसाठी संपूर्णत: बंद असेल.

    वर्षभरात उपरोक्त सुट्टयांव्यतिरिक्त प्रशासनाने सार्वजनिक सुट्टी म्हणून निर्धारित केलेल्या आठ सुट्ट्यांच्या दिवशी तसेच बारा दिवस प्रशासनाने मंजूर केलेल्या केलेल्या कार्यक्रमांसाठी जलतरण तलावाची सुविधा बंद ठेवण्याचे अधिकार प्रशासन राखून ठेवत आहे.

    अशा बंद कालावधीकरिता सभासदांना सभासदत्वाचा कालावधी वाढवून देण्यात येणार नाही.

  • (7) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही जलतरण तलावांचे सभासद असलेला व्यक्ती त्याचे सभासदत्व असलेला तरण तलाव सोडून इतर कोणत्याही तरण तलावाचे स्वत:साठी उपलब्धतेनुसार, आगाऊ शुल्क भरून दैनंदिन तिकिट घेऊ शकतो.
  • (8) नेमून दिलेला सत्राचा कालावधी संपल्यावर आस्थापनेच्या बाहेर न पडणा-या सभासदांचा वैध कालावधी टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येईल. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
    दैनंदिन निर्धारित सत्र कालावधीपेक्षा अधिक वापराचा कालावधी मान्य वैधतेचा कमी करण्यात येणारा कालावधी
    01 ते 60 मिनिटं एक दिवस
    61 ते 120 मिनिटं दोन दिवस
    121 ते 180 मिनिटं तीन दिवस
    181 ते 240 मिनिटं चार दिवस
    एखाद्या सभासदाने सलग तीस दिवसांच्या कालावधीत अधिकचा कालावधी पाच पेक्षा जास्त वेळेस वापरल्यास उपरोक्त वजावटी व्यतिरिक्त पंधरा दिवसांचा वैधता कालावधी कमी करण्यात येईल.
  • (9) कमी करण्यात आलेल्या वैधता कालावधीची मुदत साठ दिवसांपेक्षा अधिक झाल्यास अशा सभासदांना सभासदत्वाचे नूतनीकरण करता येणार नाही. वैधता कालावधी संपल्यावर त्याचे सभासदत्व संपुष्टात येईल. तथापि सदर सभासद उपलब्धतेनुसार नविन सभासदत्वाची प्रक्रीया पूर्ण करून नविन सभासदत्व घेऊ शकतो.
  • (10) जीवरक्षक/जलतरण निर्देशकांशी सभासदाने हुज्जत घातल्यास सभासदत्व रद्द करण्यात येईल. सभासदाला कोणतीही तक्रार असल्यास त्याने त्याची तक्रार कार्यालयातील तक्रार नोंदवहीत नोंदविणे आवश्यक आहे. तक्रारीबाबत आस्थापनेतील कोणत्याही कर्मचा-याशी हुज्जत घालू नये/वादविवाद करू नयेत व असे केल्यास सभासदाचे सभासदत्व पूर्णपणे रद्द करण्याचे अधिकार व्यवस्थापनाकडे असतील.
  • (11) जलतरणासाठी व्यवस्थापनाने निर्धारित केलेला पोषाख परिधान करणे सभासदांना बंधनकारक असून योग्य पोषाख परिधान न करणा-या सभासदाला पोहण्यास अनुमती दिली जाणार नाही. महिला सभासदांनी पोहताना टोपी घालणे बंधनकारक आहे तसेच लांब केस असणा-या पुरूष सदस्यांनी जलरोधक टोपी घालणे बंधनकारक आहे.
  • (12) सभासदाने स्वत:चे कपडे, चीजवस्तू, सामान स्वत:च्या जबाबदारीवर ठेवावे. ते गहाळ झाल्यास/ चोरी झाल्यास व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
  • (13) कोणतेही तेल/ बॉडी लोशन/रसायन/क्रिम इ. लावून येणा-या सभासदांना जलतरण तलावात प्रवेश दिला जाणार नाही. शरीराच्या कोणत्याही भागावर बँडेजपट्टी केलेल्या सभासदांना तरण तलावात प्रवेश दिला जाणार नाही.
  • (14) इतर सभासदांना इजा होण्याची शक्यता लक्षात घेता नखे वाढलेल्या सभासदांना तरण तलावात प्रवेश दिला जाणार नाही. उपाशीपोटी, थकलेल्या अवस्थेत, ताप आलेला असताना किंवा कोणत्याही व्याधीने आजारी असताना पोहण्यास बंदी आहे तसेच कोणत्याही प्रकारचा त्वचारोग/संसर्गजन्य रोग आढळल्यास किंवा सभासद आजारी असल्याचे आढळल्यास सभासदाला प्रवेश नाकारला जाईल.
  • (15) तरण तलाव स्नानगृहात तसेच परिसरात दात घासणे, नखे कापणे, केस कापणे, दाढी करणे यास बंदी असून असे करताना आढळणा-या सभासदाचे सभासदत्व रद्द करण्यात येईल.
  • (16) जलतरण तलावात काचेचे/ धातूचे/ प्लास्टिकचे धार्मिक धागे, दागदागिने किंवा तत्सम आभूषणे घालून प्रवेश करू नये, सभासदाची कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास तक्रार स्विकारली जाणार नाही व प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही.
  • (17) उथळ पाण्यात उड्या मारण्यास/ सूर मारण्यास बंदी आहे.
  • (18) सभासदांनी /पाहूणा सभासदांनी/ अभ्यागतांनी पादत्राणे (चप्पल/बूट इ.) घालून तरणतलावात तसेच डेकवर फिरण्यास बंदी आहे.
  • (19) फक्त पोहण्यासाठी येणा-या सभासदांनाच डेकवर प्रवेश दिला जाईल. सभासद पोहण्यास आला नसेल आणि सभासदाने डेकवर प्रवेश केला तर अशा सभासदाचे सभासदत्व रद्द करण्याचे अधिकार व्यवस्थापनाकडे असतील. सभासदांव्यतिरिक्त अन्य कोणासही जलतरण तलाव परिसरात (डेकवर) प्रवेश दिला जाणार नाही. ज्या तरण तलावाकरिता प्रेक्षक सज्जा उपलब्ध असेल तेथे सभासदांबरोबर येणा-या पालकांना/ अभ्यांगतांना प्रेक्षक सज्जात विनामुल्य प्रवेश दिला जाईल. महिलांच्या विशेष सत्राच्यावेळी प्रेक्षक सज्जात महिलांव्यतिरिक्त कोणासही प्रवेश दिला जाणार नाही. लहान मुलांसोबत येणा-या पालकांनी प्रेक्षक सज्जात बसून आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे. पालकांना जलतरण तलाव डेकवर प्रवेश दिला जाणार नाही. जलतरण तलावाच्या किना-यास उभे राहू नये. जीवरक्षक/ जलतरण निर्देशकांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने घोळका जमवू नये. अशा पाल्यांचे सभासदत्व रद्द करण्यात येईल.
  • (20) जलतरण तलाव परिसरात धावणे, एकमेकांना धक्का मारणे, उड्या मारणे, आरडाओरडा करणे, गाणी गाणे, नाचणे, कोणत्याही यंत्राच्या / वाद्याच्या आधारे संगीत वाजविणे यांस बंदी आहे.
  • (21) ज्या जलतरण तलावांच्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगपालिकेतर्फे ध्वनीक्षेपकांव्दारे (Public Addressed System) संगीत वाजविण्याची सुविधा आहे. तेथे महानगरपालिका कर्मचा-यांच्या उपस्थितीत संगीत वाजवता येईल व ध्वनीक्षेपकांवर कोणत्या प्रकारचे संगीत वाजवायचे याबातचे अधिकार व्यवस्थापनाकडे राहतील.
  • (22) खाण्याच्या / पिण्याच्या वस्तू जलतरण तलावावर नेण्यास बंदी आहे.
  • (23) जलतरण तलाव परिसरात प्राणी आणण्यास मनाई आहे.
  • (24) सभासदांकडून कोणत्याही प्रकारे महानगरपालिकेच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण भरपाई सभासदांकडून करण्यात येईल व प्रसंगी सभासदाचे सभासदत्व रद्द देखील करण्यात येईल. तसेच पोलिस/कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार व्यवस्थापनाकडे असतील.
  • (25) कोणत्याही जलतरण तलाव सभासदाला जलतरण तलाव प्रशासनाच्या कर्मचारी/अधिका-यांच्या कर्तव्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.
  • (26) कर्तव्यावर असलेल्या जलतरण तलावावरील कर्मचा-यांच्या सूचनांचे पालन करणे सभासदांसाठी बंधनकारक आहे.
  • (27) प्रशासनाने जर ओळखपत्र दिले आणि सभासदाचे ओळखपत्र गहाळ झाल्यास,चोरी झाल्यास दुय्यम ओळखपत्रासाठी विहीत शुल्क भरून दुय्यम ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येईल. नियम शिथील करुन दुय्यम ओळखपत्र उपलब्ध करून देण्याबाबतचे अधिकार व्यवस्थापनाकडे राखून ठेवण्यात येत आहेत.
  • (28) वय वर्षे 02 च्या खालील नागरिकांना सभासदत्व दिले जाणार नाही. वय वर्ष 02 व त्यावरील ते 06 वर्षांपर्यंतच्या सभासदांच्याबाबतीत प्रवेश घेताना प्रौढ सभासदाने परिशिष्ट क्र.दोन नुसार प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक असून अशा सभासदांसमवेत प्रतिज्ञापत्र सादर करणा-या किंवा प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या प्रौढ सभासदांनी पाण्यात उतरणे बंधनकारक आहे, अन्यथा दोन्ही सभासदांची सभासदत्वे रद्द करण्यात येतील. फक्त वय वर्षे 06 पर्यंतच्या मुलांना महिलांसाठीच्या विशेष सत्रात त्यांच्या महिला पालकांसमवेत प्रवेश दिला जाईल. वय वर्षे 18 पर्यंत वयाच्या सभासदांना सभासदत्व घेताना पालकांचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • (29) नैसर्गिक किंवा कोणत्याही आकस्मिक आपत्तीमुळे/ घटनेमुळे तरण तलावाची सुविधा बंद करणे गरजेचे असल्यास त्याबाबत सर्व अधिकार व्यवस्थापनाकडे असतील व अशा घटनांच्या वेळी कोणत्याही प्रकारचा परतावा करण्यात येणार नाही अथवा अतिरिक्त वाढीव कालावधी देण्यात येणार नाही.
  • (30) दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी प्रशासनाच्या कारणांस्तव तरण तलावाची सुविधा बंद ठेवण्यात आली तर बंद कालावधीइतका कालावधी सभासदांना वाढवून देण्याचे सर्व अधिकार प्रशासनाकडे राहतील. दहा ते तीस दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी जलतरण तलावाची सुविधा बंद ठेवावी लागली तर सभासदांना वाढीव कालावधी देण्याबाबतचे अधिकार संबंधित तरण तलाव व्यवस्थापनांच्या अधीन असतील व त्याहून अधिक कालावधीसाठी जलतरण तलावाची सुविधा बंद ठेवावी लागली तर संबंधित उप आयुक्तांच्या मंजूरीने सभासदांना वाढीव कालावधी देण्यात येईल. तथापि सभासदांना वाढीव कालावधी देण्याबाबतचे सर्व अधिकार प्रशासन राखून ठेवत आहे. वाढीव कालावधीबाबत कार्यालयाचे/प्रशासनाचे निर्णय सभासदांना बंधनकारक असून त्याबाबत कोणतीही तक्रार स्विकारली जाणार नाही.
    आवश्यकतेनुसार वार्षिक परिरक्षणासाठी प्रति वर्षी सलग दहा दिवस तरण तलाव बंद ठेवण्यात येईल व ह्या बंद कालावधीसाठी कोणतीही वाढ/परतावा देण्यात येणार नाही.
  • (31) एखाद्या सभासदाबाबत अन्य सभासदांकडून कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्याची शहानिशा करून ज्याच्या विरूध्द तक्रार प्राप्त झाली आहे, अशा सभासदाचे सभासदत्व रद्द करण्याचे अधिकार सहाय्यक व्यवस्थापक/व्यवस्थापक यांच्या अधीन असतील.
  • (32) पाण्याचा अपव्यय करणा-या सभासदांवर कारवाई करण्याचे तसेच सभासदत्व रद्द करण्याचे अधिकार सहाय्यक व्यवस्थापक/व्यवस्थापक यांच्या अधीन असतील.
  • (33) गैरवर्तणूक करणा-या सभासदांचे तसेच नियमांचा भंग करणा-या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात येईल, याची सभासदांनी नोंद घ्यावी.
  • (34) जलतरण तलावावर आणि परिसरात धुम्रपान/मद्यपान करण्यास बंदी आहे तसेच तंबाखू, गुटखा, अंमली पदार्थ सेवन करण्यास / सेवन करून येण्यास/खाऊन जलतरण तलावात प्रवेश करण्यास मनाई आहे. असा सभासद आढळल्यास त्याचे सभासदत्व रद्द करण्याचा अधिकार प्रशासन राखून ठेवत आहे.
  • (35) जलतरण तलाव परिसरात नागरिकांना/सभासदांना छायाचित्रे/सेल्फी काढण्यास/चित्रीकरण करण्यास मनाई आहे. अशा प्रकरणांत सभासद असलेल्या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात येईल व इतर प्रकरणी पोलिस/कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • (36) अस्वच्छतेच्या कारणांस्तव सभासदाला जलतरण तलावाच्या सुविधेपासून वंचित ठेवण्याबाबतचे (तात्पुरते निलंबन) तसेच सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचे अधिकार कार्यालयाकडे असतील, अशा प्रकरणांत कोणताही वाढीव कालावधी/परतावा दिला जाणार नाही.
  • (37) प्रशासनाने सभासदत्व रद्द केलेल्या सभासदाने जर प्रशासनाच्या लेखी परवानगी शिवाय ऑनलाईन पध्दतीने पुनश्च सभासदत्व घेतले तर अशा सभासदाचे नव्याने घेतलेले सभासदत्व देखील रद्द करण्याचे अधिकार प्रशासनाकडे असतील व अशा प्रकरणात कोणताही परतावा दिला जाणार नाही.
  • (38) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रचलित नियमांनुसार/धोरणानुसार सभासदांना/ पाहूणा सभासदांना/ अभ्यांगतांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी त्या-त्या आस्थापनेत जागेच्या उपलब्धतेनुसार विहीत शुल्क भरून वाहने उभी करता येऊ शकतील. तथापि सभासदांनी/पाहुणा सभासदांनी/ अभ्यांगतांनी त्यांची वाहने स्वत:च्या जबाबदारीवर उभी करायची आहेत. सभासदांना वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे व्यवस्थापनास बंधनकारक नाही.
  • (39) ज्या तरण तलाव संकुलात जलतरणाशिवाय इतर क्रीडा प्रकार उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी जलतरण तलावाचे नियम इतर क्रीडा प्रकारांच्या सभासदांना त्यांच्या खेळाच्या स्वतंत्र नियमावलीसह बंधनकारक असतील.
  • (40) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धोरणानुसार शुल्कसूचीत दरवर्षी नियमित दरवाढ केली जाते. त्यानुसार देय असलेले शुल्क भरणे सभासदांना बंधनकारक असेल. (सध्या लागू असलेले परिपत्रक क्र.सीए/एफआरएम/49, दि.07-02-2013)
  • (41) कोणत्याही तरण तलावाच्या एखाद्या सभासदाकडून वसूली करायची असल्यास ती कोणत्याही तरण तलावाचे सभासदत्व घेताना करण्याचे अधिकार प्रशासन राखून ठेवीत आहे.
  • (42) परताव्यांच्या प्रकरणांत उप आयुक्त (उद्याने) त्यांच्या विशेषाधिकारात निर्णय घेऊ शकतील.

आवश्यकतेनुसार वरिल सर्व नियम व विनियमांत बदल करण्याचा अधिकार प्रशासन राखून ठेवत आहेत.

Back

18001233060

8AM - 8PM